सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर : येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील प्रा. जाधव पोपट यशवंत यांना त्यांच्या उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय, पुणे यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. जाधव यांनी “समकालीन हिंदी उपन्यासों चित्रित मुंबई परिवेश” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रो. डॉ. सदानंद भोसले (अध्यक्ष, हिंदी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय, पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे, व्यवस्थापन समितीचे सचिव सतीश लकडे तसेच सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments