सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील रहिवासी श्रीमती रंजना रामचंद्र लकडे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने खंडोबाची वाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती उपतालुकाध्यक्ष मच्छिंद्र लकडे यांच्या मातोश्री होत. स्वभावाने प्रेमळ, मनमिळावू व कुटुंबवत्सल असलेल्या रंजना लकडे यांनी आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लकडे कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.
श्रीमती रंजना लकडे यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता खंडोबाची वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

0 Comments