यवतमाळ। ईसापुरच्या मंगल थोरात यांची मुंबई पोलिस दलात निवड


पुरंदर रिपोर्टर live 

पुसद (जि. यवतमाळ) सोमेश स्वामी ; 

               पुसद तालुक्यातील ईसापुर धरण परिसरातील रहिवासी मंगल उत्तमराव थोरात यांनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मुंबईतील मीरा-भाईंदर पोलिस दलात निवड मिळवली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत त्यांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे परिसरात समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

               मंगल थोरात यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सातत्याने सुरू ठेवली. नियोजनबद्ध अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या यशामागे त्यांचे वडील श्री. उत्तम थोरात व आई आणि काका यांचे योगदान असून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सहायक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले त्यांचे भाऊजी  प्रकाश सुदामराव कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले जाते.

                 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत असून “योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि चिकाटी यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा सकारात्मक संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित होत आहे.

                मंगल थोरात यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments