पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर : विजय लकडे
करंजे (ता. बारामती) येथे सोमवारी पार पडलेल्या बैठकीत भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुकाध्यक्षपदी मधुकर बनसोडे यांची एकमुखाने निवड करण्यात आली. संघाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ हे होते. त्यांच्यासमवेत पुणे जिल्हाध्यक्ष तैन्नूर शेख, जिल्हासचिव काशिनाथ पिंगळे, आणि मावळते तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांची उपस्थिती होती.
तालुकाध्यक्ष पदासाठी मधुकर बनसोडे आणि सोमनाथ पिसाळ यांची नावे चर्चेत होती. यामध्ये एकमताने मधुकर बनसोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मोहम्मद शेख यांची उपाध्यक्ष, शरद भगत यांची सचिव म्हणून निवड झाली.
कार्याध्यक्ष: सीमा चोपडे
सहसचिव: माधव झगडे
खजिनदार: सोमनाथ लोणकर
प्रसिद्धी प्रमुख: जितेंद्र काकडे
हल्लाकृती समिती प्रमुख: अजय पिसाळ
संघटक: निखिल नाटकर
सदस्य: फिरोज भालदार
अध्यक्षीय भाषणात सिकंदर नदाफ यांनी सांगितले की, "भारतीय पत्रकार संघ केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातील २२ राज्यांमध्ये कार्यरत आहे. बारामती तालुक्यात संघाची अधिक ठोस बांधणी करून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी एकजूट आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष तैन्नूर शेख यांनी पत्रकारांसाठी लागू असणाऱ्या नवीन नियम व कायद्यांविषयी माहिती दिली. जिल्हासचिव काशिनाथ पिंगळे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मावळते तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांनी संघाची एकजुटीची परंपरा कायम ठेवावी असे आवाहन केले.
निवडीनंतर मधुकर बनसोडे यांनी संघाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांचे, सहकाऱ्यांचे आणि पत्रकार बांधवांचे आभार मानत, "संघटना बळकट करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन," असा विश्वास दिला.
0 Comments